डी एन नगर परिसरातील रडार अन्यत्र हलवणार

डी एन नगर परिसरातील रडार अन्यत्र हलवणार
Published on

डी. एन. नगर परिसरातील रडार अन्यत्र हलवणार

मुंबई, ता. ४ : जुहू, डी. एन. नगर परिसरातील विमानपतन प्राधिकरणाचे रडार अन्यत्र हलवण्याचा निर्णय झाल्यामुळे येथील इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. या परिसरातील प्राधिकरणाचे ट्रान्समीटर, रिसिव्हर स्टेशन आणि रडार यांच्यामुळे तेथील इमारतींच्या उंचीवर निर्बंध आले होते. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकासही रखडला होता. अशा स्थितीत हे रडार अन्यत्र हलवण्याची शिफारस पुनर्विकासासाठी शासनाने नेमलेल्या दरेकर अभ्यास गटाने केली होती.

दरेकर अभ्यास गटाची ही शिफारस आता केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने मान्य केली असून, तसे परिपत्रकही प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे आता या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती स्वयं, समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली. या परिसरात गिल्बर्ट हिलच्या शेजारी विमानपतन प्राधिकरणाची मोकळी जमीन असून तेथे रडार, ट्रान्समीटर आणि रिसिव्हिंग स्टेशन आहेत. त्यामुळे इमारतींच्या उंचीवर निर्बंध आल्याने पुनर्विकास व्यवहार्य होत नव्हता, याबाबत दरेकर यांनी राज्यात व केंद्रात सतत पाठपुरावा केला होता. आता केंद्राच्या निर्णयानंतर पुनर्विकास प्रस्तावांचा अभ्यास करून उंचीचा निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल. तसेच येथील पुनर्विकास प्रस्तावांना त्वरेने मंजुरी दिली जाईल. त्यामुळे येथील रहिवाशांना दिलासा मिळेल, अशी माहिती दरेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com