

राजस्थानच्या राज्यपालांची सेंट्रल मार्डने घेतली भेट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : निवासी डॉक्टरांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सेंट्रल मार्डच्या (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स) प्रतिनिधी मंडळाने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बगाडे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व सेंट्रल मार्डचे सरचिटणीस डॉ. स्वप्नील केंद्रे यांनी केले. या प्रतिनिधी मंडळात डॉ. चैतन्य धावरे आणि डॉ. स्नेहा गुणाले यांचाही समावेश होता.
बैठकीदरम्यान देशभरातील वैद्यकीय व्यवस्थेच्या आढाव्यावर आधारित रिव्हायू ऑफ मेडिकल सिस्टीम सर्वेक्षणाचे निष्कर्ष सादर करण्यात आले. तसेच निवासी डॉक्टरांसाठी मानसिक आरोग्य सहाय्य देणाऱ्या मेंटल हेल्थ रेड्रेसेल हेल्पलाइनच्या विस्ताराचा मुद्दा, कामाच्या ठिकाणी वाढती तणावपूर्ण परिस्थिती, बर्नआउट, जास्तीचे कामाचे तास तसेच स्टायपेंड, पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय शिक्षणातील सुधारणा या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. राज्यपालांनी सेंट्रल मार्डच्या प्रयत्नांचे कौतुक करीत निवासी डॉक्टरांच्या कल्याणासाठी आणि आरोग्य व्यवस्थेच्या उन्नतीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या वेळी डॉ. स्वप्नील केंद्रे यांनी राज्यपालांचे मार्गदर्शनाबद्दल आभार मानत सेंट्रल मार्डच्या वतीने सहकार्याच्या माध्यमातून सुधारणा करण्याच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.