केईएम–जीएस वैद्यकीय महाविद्यालय शताब्दी ग्रंथ ‘ऍनल्स’चे प्रकाशन

केईएम–जीएस वैद्यकीय महाविद्यालय शताब्दी ग्रंथ ‘ऍनल्स’चे प्रकाशन
Published on

शताब्दी ग्रंथ ‘ॲनल्स’चे प्रकाशन
केईएम-जीएस वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रवास उलगडणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ५ : सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे सातवे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या ‘ॲनल्स’ या ग्रंथातून या ऐतिहासिक संस्थांचा शंभर वर्षांचा प्रवास प्रभावीपणे उलगडण्यात आला आहे.
कै. डॉ. सुनील के. पंड्या यांनी लेखन केलेल्या आणि डॉ. लोपा मेहता यांनी पूर्णत्वास नेलेल्या या ग्रंथाचे रसग्रहण डॉ. अविनाश सुपे यांनी केले आहे. या ग्रंथात केवळ घटनांची नोंद नसून, संस्थेच्या जडणघडणीतील मूल्ये, आव्हाने, यश आणि मानवी पैलू यांचे जिवंत चित्रण करण्यात आले आहे. हा ग्रंथ वाचताना एखाद्या इतिहासग्रंथाची नव्हे, तर आठवणींच्या प्रवासाची अनुभूती येते.

यात संस्थेच्या उत्कृष्टतेमागील नियोजन, निष्ठा आणि सातत्य यांचा ठसा या लेखनातून उमटतो. ग्रंथाची त्रिखंडी रचना विशेष लक्षवेधी ठरते. स्थापनेपासून १९४५ पर्यंतचा काळ, स्वातंत्र्योत्तर विस्तार आणि विविध आठवणी व अभिलेखीय नोंदी अशा भागांतून संस्थेचा सर्वांगीण आढावा घेतला आहे. शिक्षक, डॉक्टर, प्रशासक आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानावर दिलेला भर हा या ग्रंथाचा भावनिक केंद्रबिंदू ठरतो. डॉ. पंड्या यांच्या निधनानंतर हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान डॉ. लोपा मेहता यांनी समर्थपणे पेलले. त्यांनी मूळ लेखनाचा आशय आणि स्वर जपत ग्रंथाला सुसंगती दिली. त्यामुळे हा ग्रंथ केवळ इतिहास न राहता जिवंत परंपरेचे प्रतिबिंब बनला आहे.

या प्रकल्पाला गोसुमेक फाउंडेशन, डॉ. संजय बिंद्रा, डॉ. अर्चना बिंद्रा तसेच इतर सहकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या वारशाच्या जतनासाठी घेतलेली पुढाकाराची भूमिका यातून अधोरेखित होते. संयत शैली, तथ्याधारित मांडणी आणि संतुलित दृष्टिकोन ही या ग्रंथाची वैशिष्ट्ये असून, तो केवळ माजी विद्यार्थी किंवा वैद्यकीय क्षेत्रापुरता मर्यादित न राहता सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाच्या इतिहासात रस असणाऱ्यांसाठीही उपयुक्त ठरतो. ‘ॲनल्स’ हा ग्रंथ केवळ स्मरणरंजन न करता, मूल्यांची जाणीव करून देणारा आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारा दस्तऐवज म्हणून महत्त्वाचा ठरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com