

‘फुलब्राइट-नेहरू’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई विद्यापीठातील मार्गदर्शन सत्र
मुंबई, ता. ५ : विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षण व संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित ‘फुलब्राइट-नेहरू फेलोशिप २०२७-२०२८’ या विषयावरील विशेष मार्गदर्शन सत्र मुंबई विद्यापीठात उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.
या सत्रात २९८ विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक सहभागी झाले होते. विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साहचर्य व विद्यार्थी सहाय्य केंद्र आणि युनायटेड स्टेट्स-इंडिया एज्युकेशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिलला विद्यानगरी (कलिना) येथील ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियममध्ये हे सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रात युनायटेड स्टेट्स-इंडिया एज्युकेशनल फाउंडेशनचे प्रादेशिक अधिकारी डॉ. रायन परेरा यांनी फुलब्राइट-नेहरू फेलोशिपची सविस्तर माहिती दिली. फेलोशिपची पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच प्रभावी अर्ज आणि मुलाखत तयारीबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. फुलब्राइट-नेहरू शिष्यवृत्ती ही पूर्ण अर्थसहाय्यित आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित फेलोशिप असून, भारत-अमेरिका शैक्षणिक सहकार्याचा महत्त्वपूर्ण दुवा आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना अमेरिकेत उच्च शिक्षण, संशोधन व अध्यापनाच्या संधी मिळतात. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ज्युलिएट कोसारझिकी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या या संधीबाबत माहिती दिली.
...
संशोधनाच्या संधींबाबत माहिती
सत्रादरम्यान डॉ. रायन परेरा यांनी विज्ञान व तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, ऊर्जा, सायबर सुरक्षा आणि एरोस्पेस यासारख्या प्राधान्य क्षेत्रांमध्ये संशोधनाच्या संधींबाबत माहिती दिली. त्यांनी त्यांच्या सादरीकरणात योग्य विषयाची निवड, स्पष्ट संशोधन उद्दिष्टे आणि परिणामकारक प्रस्ताव लेखन यांचे महत्त्व अधोरेखित केले. पात्रतेसाठी भारतीय नागरिकत्व, उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी, इंग्रजीवरील प्रभुत्व आणि फेलोशिपनंतर भारतात परतण्याची अट आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. अर्ज प्रक्रियेत स्टेटमेंट ऑफ पर्पज, सीव्ही, शिफारसपत्रे आणि लेटर ऑफ इन्व्हिटेशन यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.