मेट्रो मार्गांचे उद्या लोकार्पण

मेट्रो मार्गांचे उद्या लोकार्पण
Published on

मेट्रो मार्गांचे उद्या लोकार्पण
बोगदा मार्गासह पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मेट्रो-९चा दहिसर-काशीगाव आणि मेट्रो-२बीचा डायमंड गार्डन-मंडाळे या दोन टप्प्याचे मंगळवारी (ता. ७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्यामुळे मेट्रोचे बहुप्रतीक्षित दोन्ही टप्पे प्रवासी सेवेत आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्याशिवाय टीबीएमद्वारे ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा मार्गाच्या खोदकामाचा आरंभ, तर बीकेसीमध्ये उभारल्या जाणाऱ्या पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते केले जाणार आहे.
मेट्रो-९ मार्गावरील दहिसर-काशीगाव या सुमारे ४.९७ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे लोकार्पण सकाळी १० वाजता दहिसर पूर्व मेट्रो स्थानक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होईल. त्यानंतर ११.३० वाजता मानपाडा, ठाणे येथे ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाचा टीबीएम लॉन्च साईटवर आरंभ होणार आहे. मेट्रो-२बीच्या डायमंड गार्डन-मंडाळे या साडेपाच किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण दुपारी १२.३० वाजता डायमंड गार्डन (चेंबूर) मेट्रो स्थानक येथे केले जाणार आहे. या वेळी पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई-भूमिपूजन केले जाणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.
...
मेट्रो-२ बी स्थानके (पहिला टप्पा)
- देशभक्त एन. जी. आचार्य उद्यान - डायमंड गार्डन मेट्रो स्थानक
- छत्रपती शिवाजी महाराज चौक मेट्रो स्थानक
- बीएसएनएल मेट्रो स्थानक
- मानखुर्द मेट्रो स्थानक
- महाराष्ट्र नगर मंडळे मेट्रो स्थानक
...
मेट्रो-९ स्थानके (पहिला टप्पा)
- दहिसर (पूर्व)
- पांडुरंग वाडी
- मिरगाव
- काशीगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com