

मंत्रालयातील अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
६.३७ लाखांची लाच घेताना पकडले
मुंबई, ता. ५ : विकासकामांचा निधी मंजूर करून देण्यासाठी अर्जदाराकडे ६.३७ लाखांची लाच मागून ती घेणाऱ्या कक्ष अधिकारी विलास लाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) खारघर परिसरात रंगेहाथ पकडले.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने त्याच्या गावातील मूलभूत सोयीसुविधांसाठी शासकीय निधी मिळावा, यासाठी मंत्रालयात अर्ज केला होता. निधीच्या कामासाठी संबंधित गावच्या सरपंचाने तक्रारदारास अधिकारपत्र दिले होते. याच कामाचा पाठपुरावा करीत असताना तक्रारदाराची ओळख आरोपी कक्ष अधिकारी लाड यांच्यासोबत झाली. त्यांनी निधी मंजूर करून देण्याकरिता ६.३७ लाखांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबी मुख्यालय गाठले. १६ मार्चला एसीबीने केलेल्या पडताळणीत लाड यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार रविवारी खारघर येथील ठरलेल्या ठिकाणी सापळा रचून लाड यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.