

बीडीडी पुनर्विकसासाठी वर्षभरात २,३५० कोटी रुपये खर्च होणार
म्हाडाकडून अर्थसंकल्पात निधीची भरीव तरतूद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प २०२९ अखेर पूर्ण करण्याचे निर्देश नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार म्हाडाने कंबर कसली असून, चालू आर्थिक वर्षात तब्बल २,३५० कोटी रुपये बीडीडी चाळ पुनर्विकसित इमारतींच्या बांधकामावर खर्च केले जाणार आहेत. त्याबबातची तरतूद म्हाडाने आपल्या अर्थसंकल्पात केली आहे.
म्हाडाकडून बीडीडी चाळ पुनर्विकासांतर्गत वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. आतापर्यंत वरळी येथील सुमारे ५५३ तर नायगाव येथील ८६४ रहिवाशांना पुनर्विकसित इमारतीमधील घरांचा ताबा दिला असून, डिसेंबरअखेर एकूण चार हजार ८८८ घरे संबंधितांना देण्याचे म्हाडाचे नियोजन आहे.
ऑक्टोबरमध्ये ५,७७८ घरांचे काम सुरू केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने वरळी बीडीडीसाठी १,४०० कोटी रुपये, नायगाव बीडीडीकरिता ७५० कोटी रुपये, तर ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ प्रकल्पासाठी २०० कोटी रुपये एवढ्या निधीची तरतूद केली असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे पुढील वर्षभरात बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या बांधकामासाठी आणि रहिवाशांना द्याव्या लागणाऱ्या भाड्याकरिता निधीचे टेन्शन असणार नाही.
कोणत्या प्रकल्पासाठी किती निधी
- नायगाव बीडीडी - ७५० कोटी रुपये
- वरळी बीडीडी - १,४०० कोटी रुपये
- ना. म. जोशी मार्ग बीडीडी - २०० कोटी रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.