मुंबईत १२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव

मुंबईत १२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान  ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव
Published on

मुंबईत १२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : राज्य शासनाचा अधिकृत ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव यंदा १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी दिली.
सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशीष शेलार यांच्या उपस्थितीत आज (ता. ६) पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे सांस्कृतिक कार्य विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत मंत्री ॲड. शेलार यांनी माहिती दिली. या बैठकीस बैठकीस विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह-व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, उपसचिव नंदा राऊत तसेच उपसचिव महेश वाव्हळ उपस्थित होते.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत गेल्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सव सुरू करण्यात आला आहे. पहिल्याच वर्षी या महोत्सवाला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्या यशाच्या पार्श्वभूमीवर यंदा चार दिवसांचा हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचे निर्देश मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com