

लाेकलसेवेचा तासभर खाेळंबा
टिटवाळ्यात सिग्नल बिघाड; एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : टिटवाळा स्थानकाजवळ कसाऱ्याच्या दिशेकडील लूप लाइनवरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने सोमवारी दुपारी रेल्वे वाहतूक विस्कळित झाली. या बिघाडामुळे डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक तासभर ठप्प झाल्याने प्रवाशांचे माेठे हाल झाले.
सोमवारी दुपारी ३.३२ वाजता सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. याबाबत माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी व सिग्नल विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी सिग्नल यंत्रणेची तपासणी करून दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू केली. सुमारे एका तासाच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी ४.३१ वाजता बिघाड दुरुस्त करण्यात आला आणि रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
यादरम्यान कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या तीन मेल-एक्स्प्रेस गाड्या तसेच तीन उपनगरी लोकल रखडल्या हाेत्या. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या विलंबाचा सामना करावा लागला. कल्याण स्थानकातच काही गाड्या खाेळंबून पडल्या हाेत्या. टिटवाळ्यानंतरच्या खडवली, आसनगाव ते कसारा या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली हाेती. विलंब झाल्याने काही प्रवाशांनी अन्य पर्यायाने पुढचा प्रवास केला. सायंकाळी हा बिघाड झाल्याने कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.