दिंडोशीच्या संतोषनगरात दोन गटांमध्ये हाणामारी

दिंडोशीच्या संतोषनगरात दोन गटांमध्ये हाणामारी
Published on

दिंडोशीच्या संतोषनगरात दोन गटांमध्ये हाणामारी
पालिकेचा अवैध घरे, दुकानांवर हातोडा

मुंबई, ता. ६ : दिंडोशीच्या संतोषनगर परिसरात रविवारी रात्री एका धार्मिक मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यात तीन ते चार जण जखमी असून, पोलिसांनी दंगलीचा गुन्हा नोंदवून दोन्ही गटांतील व्यक्तींना आरोपी केल्याची माहिती दिली.
यातील एका गटातील दंगेखोरांची अवैध दुकाने, घरांवर सोमवारी बुलडोझर फिरवला. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गटाने रविवारी संध्याकाळी परिसरात धार्मिक मिरवणुकीचे आयोजन केले. मिरवणुकीत मोठ्या आवाजात भक्तिसंगीत वाजत होते. त्याबाबत अन्य गटातील काहींनी आक्षेप नोंदवला. त्यावरून वाद झाला आणि कोयते, लोखंडी सळ्या, लाठ्याकाठ्या हाती घेत दोन्ही गट एकमेकांशी भिडले. यात तीन ते चार जण जखमी झाले. आक्षेप नोंदवणाऱ्या गटातील काहींनी थाटलेली अवैध दुकाने, घरांबाबत अन्य गटाने पालिकेकडे तक्रारी केल्या. सोमवारी सकाळी ही घरे आणि दुकाने पालिकेकडून उद्ध्वस्त करण्यात आली. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळेल, ही शक्यता लक्षात घेत पोलिसांनी संतोषनगर आणि आसपासच्या वस्त्यांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दोन्ही गटांतील दंगेखोरांना आरोपींपैकी काहींना ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com