नूतनीकरण न झाल्यास परवाना रद्द

नूतनीकरण न झाल्यास परवाना रद्द
Published on

नूतनीकरण न झाल्यास परवाना रद्द

अग्निशमन दलाच्या बिनतारी संदेश यंत्रणेवर टांगती तलवार

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ६ : मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बिनतारी संदेश यंत्रणेचा (वायरलेस सिस्टीम) परवाना नूतनीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाच्या नियमांनुसार या यंत्रणेचे दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक असून, तसे न झाल्यास परवाना रद्द होण्याची भीती निर्माण झाली आहे. यासाठी महापालिकेला वार्षिक सुमारे १७.५२ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

​मुंबईतील आगीच्या घटना आणि आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाचे जवान ५०-६० वर्षांपासून बिनतारी यंत्रणेचा प्रभावी वापर करीत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांत मिळून ३६ मुख्य केंद्रे, १९ छोटी केंद्रे आणि २९० हून अधिक वाहनांचा ताफा या यंत्रणेद्वारे एकमेकांशी जोडलेला आहे. पूर्वी या यंत्रणेसाठी परवान्याची सक्ती नव्हती; मात्र आता केंद्र सरकारच्या संचार मंत्रालयाने परवाना घेणे आणि त्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे अनिवार्य केले आहे.

​नूतनीकरण वेळेत न झाल्यास परवाना रद्द होऊ शकतो. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष कामगिरीवर असताना संदेशवहन करणे अशक्य होईल. परवाना रद्द झाल्यास नवीन परवाना मिळवण्यासाठी केवळ शुल्कच नाही, तर मोठ्या प्रमाणात दंडही भरावा लागेल, अशी माहिती महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

अग्निशमन दलाची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने या खर्चाला मंजुरी देऊन नूतनीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यावर भर दिला आहे.
.....
​खर्चाचा तपशील
वार्षिक नूतनीकरण शुल्क : दाेन लाख ५२ हजार ७५० रुपये
​रॉयल्टी : १५ लाख रुपये
​एकूण बिनतारी संच : ८९८

.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com