देवनार पशुवधगृहाचे होणार ‘डिजिटलायझेशन’

देवनार पशुवधगृहाचे होणार ‘डिजिटलायझेशन’
Published on

देवनार पशुवधगृहाचे होणार ‘डिजिटलायझेशन’
बकरी ईदसाठी क्यूआर कोड यंत्रणा सज्ज
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ७ : आशियातील सर्वात मोठे पशुवधगृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवनार पशुवधगृहाच्या कामकाजात आता आधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव होणार आहे. महापालिकेने आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर देवनार येथील व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यंदा प्राण्यांच्या विक्रीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गेटपाससाठी क्यूआर कोड आधारित सॉफ्टवेअर यंत्रणा विकसित केली जाणार असून, त्यासाठी पालिकेने ई-निविदा जाहीर केल्या आहेत.
दरवर्षी बकरी ईदच्या कालावधीत देवनार पशुवधगृहात शेळ्या, मेंढ्या आणि म्हैसवर्गीय प्राण्यांची मोठी आवक होते. हजारो व्यापाऱ्यांच्या नोंदी करणे आणि त्यांना गेटपास देणे ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आणि वेळखाऊ असते. ही समस्या सोडवण्यासाठी महापालिका आयुक्त आणि महाव्यवस्थापक (देवनार पशुवधगृह) यांनी सॉफ्टवेअर यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.
केवळ तंत्रज्ञानच नव्हे, तर प्रत्यक्ष भौतिक सुविधांकडेही प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. पशुवधगृहातील स्वच्छता विभागासाठी आवश्यक असलेल्या लोखंडी हातगाड्या, तसेच सणासुदीच्या काळात वापरात येणाऱ्या स्टील हँडकार्ट आणि लोखंडी चौक्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. या दुरुस्तीमुळे कर्मचाऱ्यांची कामाची क्षमता वाढणार असून, स्वच्छतेचा दर्जा राखण्यास मदत होईल.
या प्रकल्पांसाठी ६ एप्रिलपासून निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक पात्र बोलीदारांना १३ एप्रिलपर्यंत आपली ई-निविदा सादर करता येईल. पात्र कंत्राटदारांची निवड झाल्यानंतर तत्काळ कामाला सुरुवात करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. इच्छुकांना यासंदर्भात अधिक माहिती पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सुसज्ज सोयी-सुविधांमुळे यंदाचा बकरी ईद उत्सव व्यापारी आणि नागरिक दोघांसाठीही अधिक सोयीस्कर ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता
या नवीन प्रणालीमुळे व्यापाऱ्यांना क्यूआर कोडद्वारे डिजिटल गेटपास दिले जातील, ज्यामुळे नाक्यांवरील गर्दी कमी होण्यास आणि नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता येण्यास मदत होईल. या कामासाठी दोन लाख ६७ हजार रुपयांची इसारा रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com