

मुंबई सेंट्रलच्या फलाट क्रमांक पाचवरील संपूर्ण ट्रॅकचे नूतनीकरण
पश्चिम रेल्वेचा ६० दिवसांचा ब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबई सेंट्रल स्थानकाच्या फलाट क्रमांक ५वरील संपूर्ण ट्रॅक नूतनीकरण कामासाठी तत्काळ ६० दिवसांचा ब्लॉक लागू करण्यात आला आहे. या काळात या ट्रॅकवर कोणतीही नियमित रेल्वे वाहतूक चालणार नाही. याचा थेट परिणाम पश्चिम रेल्वेच्या चार महत्त्वाच्या मेल व एक्स्प्रेस गाड्यांवर होईल. या गाड्या पुढील आदेशापर्यंत फक्त दादर स्थानकापर्यंतच चालवल्या जातील.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले, की ब्लॉकचा उद्देश ट्रॅकचे दुरुस्ती काम वेळेत पूर्ण करणे आणि भविष्यातील अपघात टाळणे हा आहे. या ब्लॉकमुळे ट्रेन क्रमांक २२९४६ ओखा-मुंबई सेंट्रल सौराष्ट्र मेल, ट्रेन क्रमांक २२२१० हजरत निजामुद्दीन-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ०९१८६ कानपूर अनवरगंज-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ०९०७६ काठगोदाम-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस गाड्या दादर स्थानकातून सुटणार आहेत.
पश्चिम रेल्वेने प्रवाशांना आवाहन आहे, की या काळात प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा विचार करावा आणि वेळापत्रकात होणाऱ्या बदलांची माहिती नियमितपणे तपासावी. तसेच ब्लॉक पूर्ण झाल्यानंतर या ट्रॅकवर सर्व गाड्या सुरळीतपणे पुन्हा सुरू होणार आहेत. यामुळे मुंबई सेंट्रलवरील रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.