

जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये ‘विविधतेचा उत्सव’
मुंबई, ता. ७ : जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन येथे ६ ते ८ एप्रिलदरम्यान दिव्यांग कलाकारांसाठीच्या विशेष कला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन यांच्या सहकार्याने व आयसोवा आणि राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग सक्षमीकरण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत मुंबई आणि परिसरातील विविध संस्थांमधील ४२ दिव्यांग कलाकारांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेत आपल्या सर्जनशीलतेची झलक सादर केली. या कार्यशाळेत १८ पेक्षा अधिक संस्था सहभागी झाल्या असून, या उपक्रमामागे आयसोवाच्या अध्यक्ष मीनाक्षी अग्रवाल यांचा महत्त्वपूर्ण पुढाकार आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे विविधतेतून निर्माण होणारी सर्जनशीलता. ऑटिझम, डाऊन सिंड्रोम, बौद्धिक दिव्यांगत्व, श्रवणदोष, अल्पदृष्टी, पॅराप्लेजिया अशा विविध प्रकारच्या दिव्यांगत्वावर मात करीत या कलाकारांनी कलेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. कलाकारांनी सूक्ष्म तपशीलांनी परिपूर्ण चित्रे रेखाटली. प्रत्येकाच्या कलेत त्यांचा स्वतःचा अनोखा दृष्टिकोन दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.