पालिका रुग्णालयांत अतिदक्षता खाटांची कमतरता

पालिका रुग्णालयांत अतिदक्षता खाटांची कमतरता
Published on

पालिका रुग्णालयांत अतिदक्षता खाटांची कमतरता
३० खाटा आरक्षित ठेवण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागातील खाटांची कमतरता समोर येत आहे. मुंबई महापालिकेच्या मोठ्या तसेच १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये मिळून सहा हजारांहून अधिक खाटा उपलब्ध आहेत. मात्र, यापैकी अतिदक्षता विभागासाठी केवळ ७९७ खाटा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे.
गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेवर अतिदक्षता विभागात खाट उपलब्ध होत नसल्याच्या घटना वारंवार घडत असून, त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिका दरवर्षी दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. या विश्वासामुळे देशभरातून अनेक रुग्ण मुंबईत उपचारासाठी येतात, परंतु प्रत्यक्षात रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता असल्याने काही ठिकाणी रुग्णांना जमिनीवर गाद्या टाकून ठेवावे लागते किंवा एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्याची वेळ येते, असे प्रकारही समोर आले आहेत.
महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयांमध्ये एकूण ६,४७३ खाटांपैकी ६८१ खाटा अतिदक्षता विभागात आहेत, तर उपनगरीय रुग्णालयांमध्ये ३,२५४ खाटांपैकी केवळ ११६ खाटा अतिदक्षता विभागासाठी आहेत. एकूण खाटांच्या तुलनेत अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या अत्यंत कमी आहे.
मुंबईतील वाढती लोकसंख्या, साथीचे रोग, अपघात, संसर्गजन्य आजार तसेच माता आणि नवजात बालकांशी संबंधित गुंतागुंत लक्षात घेता अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या वाढवणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

रुग्णालयनिहाय खाटांची उपलब्धता-
केईएम रुग्णालय - २,२५० खाटा, ३२८ अतिदक्षता विभागात
नायर रुग्णालय - १,६२३ खाटा, १४० अतिदक्षता विभागात
सायन रुग्णालय - १,८५० खाटा, १७३ अतिदक्षता विभागात
कूपर रुग्णालय - ७५० खाटा, ४० अतिदक्षता विभागात

लवकरच ठरावावर चर्चा
या परिस्थितीवर उपाय म्हणून अतिदक्षता विभागातील ३० टक्के खाटा आरक्षित ठेवण्याची मागणी जोर धरत आहे. नगरसेविका मेहेर हैदर यांनी यासंदर्भात ठराव मांडला असून, लवकरच महापालिका सभागृहात या विषयावर चर्चा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com