

कांदिवलीत भरधाव डम्परने बालिकेला चिरडले
मुंबई, ता. ७ ः कांदिवली पश्चिमेकडील चारकोप नाका, ऑस्कर हॉस्पिटलजवळ मंगळवारी दुपारी शाळेत निघालेल्या सात वर्षांच्या बालिकेला भरधाव डम्परने चिरडले. ऋतिका चौहान असे या मृत बालिकेचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करीत परिसरातील वाहतूक नियमनासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
दरम्यान, अपघातास जबाबदार असलेला डम्परचालक पप्पू पटेल याला चारकोप पोलिसांनी अटक केली. नागरिकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कांदिवली वाहतूक पोलिसांना चारकोप नाका परिसरात वाहतूक नियमनासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यास सांगण्यात आल्याचे चारकोप पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात घडला त्याच परिसरातील पालिका शाळेत ऋतिका शिकत होती. शाळेत जाण्यासाठी रस्ता ओलांडताना भरधाव डम्परची तिला धडक बसली. धडकेत ती डम्परखाली चिरडली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.