बँकेच्या पासबुकमुळे भांडाफोड

बँकेच्या पासबुकमुळे भांडाफोड
Published on

बँकेच्या पासबुकमुळे भांडाफोड
सव्वा कोटींचे दागिने चोरणारा नोकर अटकेत

मुंबई, ता. ९ ः कितीही सराईत गुन्हेगार असला तरी कोणतातरी पुरावा मागे सुटतोच, याचा प्रत्यय ताडदेव पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यातून झाले आहे. कारण मालकाचे पिढीजात दागिन्यांची सराफा बाजारात विक्रीतून मिळालेल्या लाखो रुपयांच्या पासबुकवरील नोंदीमुळे चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
भारतीय रुग्णालय परिसरात वास्तव्य करणाऱ्या व्यावसायिकाचे ताडदेव चौकातही घर आहे. या घराच्या साफसफाईसाठी त्यांनी नोकर ठेवला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न समारंभाच्या निमित्ताने व्यावसायिकाने घर उघडून पिढीजात दागिन्यांसाठी कपाट उघडले असता सव्वा कोटीचे सोने-चांदीचे दागिने तिजोरीतून गायब होते. या प्रकरणात व्यावसायिकाने कुटुंबीयांसह नोकरदारांची झाडाझडती घेतली. तसेच घरातील नोकराच्या सामानाची तपासणी केली असता लाखो रुपयांच्या व्यवहारांमुळे चोरीची उकल झाली.
------------------------
मध्यस्थामार्फत विक्री
ताडदेव पोलिसांनी केलेल्या चौकशीत नोकराने चोरीची कबुली दिली आहे. मालकाच्या दुसऱ्या घरातील दागिने चोरून एका मध्यस्थामार्फत सराफा बाजारात वितळवून त्यातून लाखो रुपये कमावल्याचे सांगितले; पण हाती आलेली रोकड मालकाच्या घरात दडवणे कठीण असल्यामुळे ती रक्कम बँकेत ठेवल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com