‘आयआयएम मुंबई’ची पहिली पदवीधर तुकडी

‘आयआयएम मुंबई’ची 
पहिली पदवीधर तुकडी
Published on

‘आयआयएम मुंबई’ची
पहिली पदवीधर तुकडी

मुंबई, ता. ९ : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (आयआयएम मुंबई)ची पहिली एमबीए तुकडी शनिवारी पदवीधर होणार आहे. ही पहिली एमबीए तुकडी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (एनआयटीआयई)मधून आयआयएम मुंबईमध्ये झालेल्या स्थित्यंतराचा भाग आहे. या तुकडीने दोन वर्षांत हा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्याव्यतिरिक्त संस्थेच्या संस्कृतीचा अनुभव घेऊन त्यात योगदानही दिले आहे, असे आयआयएमचे संचालक प्रा. मनोज तिवारी म्हणाले.

पूर्वी एनआयटीआयई म्हणून ओळखली जाणारी आताची आयआयएम मुंबई ही १९६३मध्ये स्थापन झालेली नामांकित व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था आहे. भारताच्या एनआयआरएफ क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेली ही संस्था कामकाज, पुरवठा साखळी, पर्यावरणपूरकता, सर्वसाधारण व्यवस्थापन या क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच वेगवेगळ्या उद्योगांसोबत समन्वय आणि सहकार्यही केल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. येथील प्राध्यापक जगातील सर्वोत्तम संस्थांतून आले असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचा दर्जाही उत्तम राहताे.

संस्थेत अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि जागतिक दर्जाचे ग्रंथालय आहे. येथे लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटमधील सेंटर ऑफ एक्सलन्सदेखील आहे. आयआयएम मुंबई ही आपल्या अध्यापन पद्धतीत नवनवीन प्रयोग करत असल्याने तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रम आणि अत्याधुनिक संशोधनामुळे येथील विद्यार्थी भारताच्या आर्थिक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. उद्योगांसोबतचे सहकार्य आणि संशोधनावरील भर यामुळे व्यवस्थापन शिक्षण संस्थांमध्ये ही अग्रगण्य संस्था आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com