रक्तदानासाठी ‘अनंत’गर्दी

रक्तदानासाठी ‘अनंत’गर्दी
Published on

रक्तदानासाठी ‘अनंत’गर्दी
गिफ्टसाठी रांगा; ‘परिषदे’च्या नियमांचे उल्लंघन

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना ग्रँट रोड येथील नाना चौकात आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिरासाठी गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र या गर्दीमागे रक्तदानानंतर देण्यात येणारी घड्याळाची भेटवस्तू हे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.
यंग स्टार कमिटीच्या वतीने आयोजित या शिबिरात सर जे. जे. रक्तपेढी, रेड क्रॉस आणि नायर रुग्णालय यांच्या रक्तपेढ्यांचा सहभाग होता. प्रत्येक रक्तदात्याला घड्याळ देण्यात आल्याने राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे बोलले जात आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या नियमानुसार, रक्तदान हे पूर्णपणे ऐच्छिक असावे आणि त्यासाठी कोणतेही प्रलोभन दाखवू नये.
रक्तदात्यांमध्येही याबाबत संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. गिरगाव येथील नीलेश सावंत म्हणाले, की मी नियमित रक्तदान करतो. माझा ‘ए निगेटिव्ह’ रक्तगट असल्यामुळे गरज जास्त असते. त्यामुळे शक्य तितक्या वेळा रक्तदान करतो; पण आजची गर्दी भेटवस्तूसाठी अधिक होती. मंगल यांनी स्पष्ट सांगितले, की मी सकाळी ८ वाजता आलो; दुपारी ३ वाजता बाहेर पडलो. व्यवस्थापनात कमतरता होती. मी घड्याळासाठी आलो. टिकेकर यांनी अव्यवस्थेवर नाराजी व्यक्त करीत सांगितले, की इतकी गर्दी आणि नियोजनाचा अभाव मी कधी पाहिला नाही. अनेक जण फक्त घड्याळासाठी आले होते. गणेश वाघमारे यांनी मी १८ वर्षांपासून नियमित रक्तदान करीत असून, ही माझी ४३वी वेळ आहे. सर्वच घड्याळासाठी आले होते, असे सांगितले.
...
सेवा भावनेतून ही गर्दी!
आयोजक अभिषेक नरसाळे यांनी सांगितले, की या शिबिरासाठी १,२०० जणांनी आधीच नोंदणी केली होती आणि १,५००पेक्षा अधिक जणांनी रक्तदान केले. पोलिस, सीआरपीएफ आणि पालिका कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. लोकांच्या सेवा भावनेतून ही गर्दी झाली. आम्ही उत्स्फूर्त प्रोत्साहनासाठी भेटवस्तू दिली.
...
तज्ज्ञांचा आक्षेप
१. तज्ज्ञांनी या प्रकारावर आक्षेप घेतला आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेचे माजी संचालक अरुण थोरात म्हणाले, की गिफ्टसाठी रक्तदान करणे आणि रक्तदानासाठी गिफ्ट वाटणे चुकीचे आहे. एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन केल्यास साठवणूक आणि वापराचे आव्हान निर्माण होते. रक्ताची एक्सपायरी तारीख ही एकच असते.
२. एसबीटीचे सहाय्यक संचालक डॉ. सुहास मोहनाळकर यांनी स्पष्ट केले, की रक्तदान हे निःस्वार्थी असावे. भेटवस्तू देऊन प्रोत्साहन देणे ही दानाच्या संकल्पनेला बाधा असून, ते चुकीचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com