श्वानांवर लैंगिक अत्याचार; नोकराविरोधात गुन्हा

श्वानांवर लैंगिक अत्याचार; 
नोकराविरोधात गुन्हा
Published on

श्वानांवर लैंगिक अत्याचार;
नोकराविरोधात गुन्हा

मुंबई, ता. ९ : मालक घरी नसताना दोन पाळीव श्वानांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नोकराविरोधात आंबोली पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार खासगी व्यवसाय करतात आणि कामानिमित्त अनेकदा दिल्ली किंवा अन्य महानगरात असतात. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी दोन पाळीव श्वान आहेत. श्वानांच्या देखभालीसाठी त्यांनी एक नोकर ठेवला आहे. तो गावी गेल्याने ओळखीतल्या रंजन शहा या व्यक्तीस तक्रारदाराने काही दिवसांसाठी श्वानांच्या देखभालीची जबाबदारी सोपवली.

७ एप्रिलला तक्रारदार दिल्लीत असताना त्यांनी घरातील सीसीटीव्ही चित्रण ऑनलाईन पाहिले तेव्हा त्यांना श्वान विचित्र हालचाली करताना आढळले. तेव्हा त्यांनी शेजाऱ्यांना संपर्क करून घरी जाऊन नेमकी परिस्थिती जाणून घेण्याची विनंती केली. शेजाऱ्यांनी नोकर रंजन यास दमात घेत चौकशी केली तेव्हा त्याने दोन्ही श्वानांवर लैंगिक अत्याचार केल्याचे कबूल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com