मेट्रो-१० साठी आठवड्याभरात निविदा

मेट्रो-१० साठी आठवड्याभरात निविदा
Published on

मेट्रो-१० साठी आठवडाभरात निविदा
गायमुख-शिवाजी चौकाचे काम चार महिन्यांत सुरू होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : ठाणे-मिरा रोड यादरम्यानची वाहतूक कोंडी कमी व्हावी, म्हणून एमएमआरडीए मेट्रो-१० अंतर्गत गायमुख-शिवाजी चौक मिरा रोड मेट्रोची मार्गिका उभारणार आहे. या कामासाठी आठवडाभरात निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून, चार महिन्यांत काम सुरू होणार असल्याने परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
एमएमआरडीएकडून मुंबईसह परिसरात मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. त्याचाच भाग म्हणून गायमुख-मिरा रोड यादरम्यान ९.२ किलोमीटर लांबीचा उन्नत मेट्रो मार्ग उभारला जाणार आहे. या मार्गिकेबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज एमएमआरडीए मुख्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.
-------------------------
घोडबंदर-गायमुख रस्त्याचे रुंदीकरण
घोडबंदर-गायमुख यादरम्यान साडेपाच किलोमीटर लांबीचा रस्ता ३० मीटर रुंदीचा आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. तसेच अवजड वाहनांमुळे कोंडी होते. याच पार्श्वभूमीवर मार्गाचे ६० मीटरपर्यंत रुंदीकरण एमएमआरडीएने करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच आवश्यक असलेला १,२०० कोटी रुपयांचा निधी एमएमआरडीएकडून दिला जाणार आहे.
-----------------
ठाणे, नवी मुंबई, कल्याणमध्ये पॉड टॅक्सी
कुर्ला-वांद्रे स्थानक यादरम्यान पीपीपी तत्त्वावर एमएमआरडीए पॉड टॅक्सी उभारणार आहे. त्याच धर्तीवर ठाणे, नवी मुंबई, कल्याण महापालिका क्षेत्रात पॉड टॅक्सी प्रकल्प राबवणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएने सहा महिन्यांत प्रकल्प अहवाल तयार करावा, असे निर्देश दिले. २०२९ पर्यंत ही सेवा सुरू होणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com