

जोरदार खरेदीमुळे निर्देशांकात वाढ
जागतिक शेअर बाजारात सकारात्मक कल
मुंबई, ता. १० : जागतिक शेअर बाजार सकारात्मक कल दाखवीत असल्याने शुक्रवारी (ता.१०) भारतीय शेअर बाजारांनी कालचा तोटा नजरेआड करत सव्वा टक्का तेजी दाखवली. यामध्ये सेन्सेक्स ९१८.६० अंश, तर निफ्टी २७५.५० अंश वाढला.
व्यवहारांना सुरुवात होताना आज सेन्सेक्स कालच्या बंद भावाच्या तुलनेत ५०० अंशावर उघडला. त्यानंतर दिवसभरात त्यात अजून वाढ झाली. आज आयटी शेअरमध्ये मोठी घसरण झाली असली, तरी बँका आणि वित्तसंस्थांच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी झाली. त्यामुळे दिवसअखेर सेन्सेक्स ७७,५५०.२५ अंशांवर, तर निफ्टी २४,०५०.६० अंशांवर स्थिरावला. आज बँका आणि वित्तसंस्था, वाहननिर्मिती, संरक्षण, बांधकाम व्यवसाय, ऊर्जानिर्मिती, धातूनिर्मिती, सरकारी बँका, खासगी बँका ही क्षेत्रे एक ते दोन टक्के वाढली, तर दुसरीकडे ‘टीसीएस’च्या निकालामुळे आयटी क्षेत्र पावणेदोन टक्के घसरले. गेले सहा आठवडे निर्देशांक सलग तोटा दाखवीत होते. मात्र, या आठवड्याची तेजी गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम आठवडा तेजी ठरली. अमेरिका इराण शांती चर्चेतील प्रगती आणि कच्च्या तेलाचे घसरलेले भाव यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. स्मॉल कॅप आणि मिडकॅप निर्देशांकदेखील दीड टक्का वाढले. आज एशियन पेंट, आयसीआयसीआय बँक, महिंद्र आणि महिंद्र या शेअरचे भाव तीन टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. इंडिगो, ॲक्सिस बँक, स्टेट बँक, बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व्ह, अदाणी पोर्ट या शेअरचे भाव दोन टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. तर दुसरीकडे सन फार्मा आणि इन्फोसिस तीन टक्के घसरले. टीसीएस अडीच टक्के तर टेक महिंद्र आणि एचसीएल टेक या शेअरचे भाव एक टक्का घसरले.
...
परदेशी वित्तसंस्थांची विक्री बुधवारपासून कमी झाली असली तरी यापुढे अमेरिका-इराण चर्चेतील प्रगती, परदेशी वित्तसंस्थांचा कल तसेच भारतीय कंपन्यांचे निकाल यावर शेअर बाजाराची पुढील वाटचाल अवलंबून आहे.
- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस.
रुपयांत १० पैसे वाढ
सकारात्मक आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे शुक्रवारी (ता. १०) भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत १० पैसे वाढून ९२.४१ वर बंद झाला. आज रुपयाचे व्यवहार ९२.५८ वर सुरू झाले. मात्र, परदेशी वित्तसंस्थांची कमी झालेली शेअर बाजारातील विक्री आणि घसरते कच्च्या तेलाचे दर यामुळे रुपयावर दबाव नव्हता, असे जाणकारांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.