भाजयुमो मुंबईची नवीन कार्यकारिणी जाहीर

भाजयुमो मुंबईची नवीन कार्यकारिणी जाहीर
Published on

भाजयुमो मुंबईची नवीन कार्यकारिणी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष दीपक सिंह यांनी शुक्रवारी (ता. १०) मुंबईतील नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. भाजप मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त केलेल्या या नवीन कार्यकारिणीत आठ उपाध्यक्ष असून तीन महामंत्री तर आठ सचिव आहेत. यामध्ये समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मुंबईची नवीन टीम ही अनुभवी आणि संघटनात्मकदृष्ट्या सक्षम आहे. मुंबईसारख्या महानगरात पक्षाची विचारधारा प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे, युवकांना मुख्य प्रवाहात आणणे आणि भक्कम संघटना उभारणे, हा आमचा उद्देश असल्याचे भाजयुमोचे अध्यक्ष दीपक सिंह यांनी सांगितले. त्यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

कार्यकारिणी
उपाध्यक्ष ः कौशिक पाटील, प्रद्युम्न सावंत, राजेंद्र मोरे, वेदांत लालवाणी, विवेक पांडे, साई नायडू, अनुप पाठक, तहवेज शेख
महामंत्री ः कमलेश डोके, अक्षय निकाळजे, स्नेहा वेमुलकर
सचिव ः प्रणव ठाकूर, विराज कुलकर्णी, जय कवठणकर, अक्षय ठाकूर, रोनक दोशी, जय तेवर, अलोक सिंह, वेदांत तिवारी
इतर पदाधिकारी : सचिन सूर्यवंशी (कोषाध्यक्ष), रिया खानोलकर (विद्यार्थी सेल प्रमुख), सूरज शर्मा (सोशल मीडिया प्रमुख), रोहित कांबळे (सोशल मीडिया सह-प्रमुख), संजय यादव (मीडिया प्रमुख), प्रमोद शुक्ला (कार्यालय प्रमुख)
कार्यकारिणी सदस्य : डॉ. विजय गायकवाड, यदन्ननेन गायकवाड, आनंद इंगळे, अभय तिवारी, हृतिक यादव, आशीष शुक्ला, अमित भंडारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com