क्लीनरमुळे अवजड वाहनावर लावला जाणारा दंड रद्द

क्लीनरमुळे अवजड वाहनावर लावला जाणारा दंड रद्द
Published on

वाहनचालकांची ‘त्या’ दंडातून सुटका
शासनाची अधिसूचना जारी; परिवहन क्षेत्राला दिलासा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः महाराष्ट्र शासनाने अवजड वाहनांमध्ये क्लीनर नसल्यामुळे लावण्यात येणाऱ्या दंडाचा प्रश्न सोडवला आहे. यासंदर्भातील सरकारी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जी परिवहन क्षेत्रातील सर्व घटकांच्या दीर्घ संघर्षाचे फलित असल्याचे ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेस सल्लागार व माजी अध्यक्ष बाल मलकीत सिंग यांनी सांगितले.
सिंग म्हणाले, की मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील अवजड वाहन आणि व्यावसायिक वाहनचालकांना क्लीनर नसल्यामुळे दररोज १,५०० दंड आणि अनेक चलानांचा सामना करावा लागत होता. ही लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी अत्यावश्यक बाब आहे. यामुळे संपूर्ण उद्योगावर अनावश्यक त्रास आणि मोठा आर्थिक भार पडत होता.
या समस्येच्या निराकरणासाठी पाठपुरावा, निवेदने आणि संबंधित अधिकारी व विभागांसोबतच्या अनेक बैठकांमुळे शक्य झाले. मुख्यमंत्री आणि परिवहनमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. कायदेशीर व्याख्यांमुळे हा विषय कायदा व न्याय विभाग, तसेच गृह विभागासह विविध विभागांमध्ये प्रलंबित राहिला. त्यामुळे अधिसूचना जारी होण्यास विलंब झाला; मात्र परिवहन क्षेत्राच्या एकजुटीच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रश्न अखेर मार्गी लागला.
==
हा केवळ प्रशासकीय निर्णय नाही, तर प्रत्येक ट्रकचालक, ट्रान्स्पोर्टर आणि या लढ्यात एकत्र उभे राहिलेल्या सर्व घटकांचा हा विजय आहे. आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि सामूहिक आवाजामुळे आम्हाला न्याय मिळाला. या निर्णयामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांची बचत होईल. तसेच मेहनती चालक आणि ऑपरेटर यांना अनावश्यक मानसिक त्रासातून मुक्ती मिळेल. एकीमध्येच ताकद आहे आणि आपण सर्व मिळून कोणतीही अडचण पार करू शकतो.
- बाल मालकित सिंग, सल्लागार व माजी अध्यक्ष ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com