

विकास निधीच्या वाटपात दुजाभाव
पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर काँग्रेसची टीका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून विरोधी पक्षांच्या नगरसेवकांवर अन्याय केला जात आहे. विकास निधीचे वाटप हे सर्व नगरसेवकांना समान प्रमाणात झाले पाहिजे, पण पालिकेतील सत्ताधारी विकास निधीच्या वाटपात पक्षपात करीत असल्याबद्दल काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे.
पालिकेतील सत्ताधारी महायुतीच्या नगरसेवकांवर कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिली जातो. मात्र, काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची अवघ्या काही लाखात बोळवण केली जाते. विकास निधी मुंबईकरांच्या विकासासाठी द्या. अशा प्रकारचा अन्याय काँग्रेस पक्ष सहन करणार नाही, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. राज्य सरकार विरोधी पक्षांशी शत्रुत्वाच्या भावनेने वागते त्याचाच कित्ता महापालिकेतही गिरवला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.