उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू?

उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू?
Published on

उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू?
हलगर्जी झाल्याचा नातेवाइकांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : वाडिया रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार महिन्यांच्या बाळाच्या मृत्यूने गंभीर वाद निर्माण झाला आहे. उपचारादरम्यान निष्काळजी झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे; मात्र रुग्णालय प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. रुग्णालयाचा मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले, की बाळाच्या प्रकृतीविषयी कुटुंबीयांना पूर्वकल्पना देण्यात आली होती. बाळ सुरुवातीलाच नाजूक स्थितीत आणण्यात आले होते.

अंबरनाथ येथील पाटील कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, २९ मार्चला त्यांच्या बाळाला क्षयरोग (टीबी) असल्याचे निदान झाले. त्यानंतर बाळाला तातडीने वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मेंदूत पाणी साचल्याचे निदान करून शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान,
शस्त्रक्रियेनंतरही बाळाची प्रकृती सुधारली नाही, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. बाळाचे वडील आशीष पाटील यांनी सांगितले, की उपचार प्रक्रियेदरम्यान योग्य माहिती न देता संमती घेण्यात आली. तसेच, रुग्णालयातील यंत्रणेमध्ये बिघाड, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या अडचणी आणि अनुभव नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून उपचार झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. उपचार सुरू असतानाच ९ एप्रिलला बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात कारवाईची मागणी केली असून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे बाळाची आई अर्चना पाटील यांनी सांगितले. दुसरीकडे, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.


रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले
वाडिया रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळत, सोशल मीडियावर फिरणाऱ्या आरोपांबाबत आमच्या रुग्णालयाकडे कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. प्रसारित होत असलेली माहिती अप्रमाणित असून ती दिशाभूल करणारी असल्याचे सांगितले. तसेच, आमचे रुग्णालय हे विशेष बालरुग्ण उपचार केंद्र असून अत्यंत गंभीर अवस्थेतील रुग्णांवर उपचार केले जातात. सर्व वैद्यकीय प्रक्रिया ठरलेल्या नियमांनुसार आणि उच्च दर्जाच्या सेवेनुसारच पार पाडल्या जातात, असेही रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com