डॉ. बाबासाहेबत आंबेडकर जयंतीला ऐतिहासिक स्थळांची मोफत सफर

डॉ. बाबासाहेबत आंबेडकर जयंतीला ऐतिहासिक स्थळांची मोफत सफर
Published on

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला ऐतिहासिक स्थळांची मोफत सफर
अनुयायी, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी पर्यटन विभागाचे विशेष आयोजन
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्याच्या पर्यटन विभागाने अनुयायी, पर्यटक आणि विद्यार्थ्यांसाठी एक विशेष भेट जाहीर केली आहे. १४ एप्रिल रोजी मुंबई, नाशिक आणि नागपूर या तीन महत्त्वाच्या शहरांमध्ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट’ सहलीचे आयोजन करण्यात आले असून, ही सहल पूर्णपणे निःशुल्क असणार आहे. पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी या उपक्रमाची माहिती देत नागरिकांना यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
​डॉ. बाबासाहेबांचे जीवनकार्य, त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या स्मृतिस्थळांना भेट देणे हा केवळ प्रवास नसून बाबासाहेबांचा समृद्ध वारसा अनुभवण्याची एक सुवर्णसंधी आहे, असे मत मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले.
​या सहलीअंतर्गत तिन्ही शहरांमधील ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या जातील.​ मुंबईतील चैत्यभूमी (दादर), राजगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा), सिद्धार्थ महाविद्यालय (फोर्ट) आणि बी. आय.टी चाळ (परळ).​ नाशिक येथे मुक्तीभूमी, त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर, तर ​नागपूर येथे दीक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय (चिंचोली) आणि ड्रॅगन पॅलेस (कामठी) येथे भेटी देण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे.
​पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे आणि पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, ही स्थळे सामाजिक परिवर्तनाची केंद्रे आहेत. या टूर सर्किटमुळे पर्यटकांना बाबासाहेबांचा इतिहास अधिक जवळून समजून घेता येईल. या उपक्रमाचे औपचारिक उद्‌घाटन १३ एप्रिलला मान्यवरांच्या उपस्थितीत झाले असून, आता १४ एप्रिलच्या मुख्य सहलीसाठी पर्यटन विभाग सज्ज झाला आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
​१४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता या सहलीला सुरुवात होईल. मुंबईत चैत्यभूमी, नाशिकमध्ये गडकरी चौक आणि नागपुरात दीक्षाभूमी येथून बस सुटतील. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. यासोबत मोफत प्रवास, गाईड (मार्गदर्शक), अल्पोपहार आणि पिण्याचे पाणी या सुविधा पर्यटन विभागामार्फत दिल्या जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com