आशाताईंना भेटण्याची इच्छा अपूर्णच!

आशाताईंना भेटण्याची इच्छा अपूर्णच!
Published on

आशाताईंना भेटण्याची इच्छा अपूर्णच!
इंडियन आयडॉलमधील गायक भावुक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : भारतीय संगीतजगताची ‘माई’ आशा भोसले यांचे रविवारी निधन झाले. त्यांनी अनेक सुपरहिट गाण्यांना आवाज दिला. अगदी गझल, अभंग, भूपाळीपासून थेट तरुणांच्या मनाला भिडणारी अनेक गाणी गायली. इंडियन आयडॉलमधील युवा गायक आणि गायिका त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोअर परळ येथे आले होते. आशाताई इंडियन आयडॉलमध्ये येणार होत्या; पण ती भेट अपूर्ण राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
आशा भोसले यांनी गाण्याच्या रूपात मोठा खजिना ठेवला आहे. त्यांची गाणी ऐकूनच आम्ही मोठे झाले आहोत. त्यांनी अनेक गायकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्यासारखा गायक पुन्हा होणे शक्य नाही. त्यांचा गायनाचा वारसा जपण्याची जबाबदारी आमच्यावर असून, आम्ही ती पार पाडू, अशा शब्दात युवा गायकांनी आशाताईंना श्रद्धांजली वाहिली.
==
९ वर्षांपूर्वी आशाताईंसमोर गाणे गाण्याची संधी मिळाली होती. इंडियन आयडॉलमध्ये त्या येणार होत्या. सर्वांना त्यांना भेटण्याची इच्छा होती. ती इच्छा अपूर्णच राहिली आहे.
- चैतन्य देवडे, गायक
===
आशाताईंचे गाणे ऐकूनच आम्ही मोठे झाले आहोत. त्या माझ्या आदर्श होत्या. मी १२ वर्षाची असताना त्यांच्याबरोबर गाणे गायले होते.
- अंशिका चोनकर, गायिका
===
आजोबा, वडील आणि मी अशा आमच्या तीन पिढ्या आशाताईंचे चाहते आहोत. त्यांनी गायकांना खूप काही शिकवले आहे. त्यांच्या समोर गाण्याची इच्छा होती, मात्र ती अपूर्णच राहिली.
- तनिष्क शुक्ला, गायक
==
आशा भोसले यांची गाणी सर्वांनाच आवडत होती. त्यांनी दिलेला संगीताचा ठेवा अजरामर ठेवण्याची आमची जबाबदारी आहे.
- मिस्मी बोसू, गायिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com