वरळीतील एसटीपीसाठी संपूर्ण जागा आवश्यक

वरळीतील एसटीपीसाठी संपूर्ण जागा आवश्यक
Published on

वरळीतील एसटीपीसाठी संपूर्ण जागा आवश्यक
महापालिकेचा न्यायालयात दावा 

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईतील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता वरळीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा (एसटीपी) विस्तार होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी १७,७५६ चौरस मीटर क्षेत्राऐवजी २७,००० चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्राची गरज असल्याचा दावा मुंबई महापालिकेने नुकताच उच्च न्यायालयात केला.
या पार्श्वभूमीवर न्या. मकरंद कर्णिक आणि न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठापुढे महापालिकेने प्रतिज्ञापत्र सादर केले. त्या प्रतिज्ञापत्रानुसार महापालिका मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येची गरज आणि पिण्याच्या पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्याची बाब विचारात घेत आहे. सध्या एसआरए प्रकल्पाला लागूनच असलेल्या ८५,२०० चौरस मीटर उपलब्ध जागेवर, ५०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेपर्यंतच्या सांडपाण्यावर तृतीय स्तरापर्यंत प्रक्रिया करणारा एसटीपी प्रकल्प बांधण्याचे काम सुरू असल्याचेही महापालिकेने न्यायालयाला सांगितले. त्यानुसार वरळी सांडपाणी प्रक्रिया केंद्र साधारणपणे जुलै २०२७ पर्यंत कार्यान्वित होईल व ते सुरुवातीच्या टप्प्यात आपल्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के एमएलडी सांडपाण्यावर तृतीय स्तरापर्यंत प्रक्रिया करण्यात येणार असल्याचा दावाही पालिकेने प्रतिज्ञापत्रात केला.  सांडपाण्याचे रूपांतर पिण्यायोग्य पाण्यात करण्याची योजनाही महापालिकेने आखली आहे.
...
प्रकरण काय?
राज्य सरकारने १२ जून २०२४ रोजी एसटीपीसाठी आरक्षित २७,७०० चौरस मीटर जमीन १७,७५० चौरस मीटरपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची कायदेशीरता तपासण्यास न्यायालयाने सांगितले होते. सरकार आणि महापालिकेकडे स्पष्टीकरणही मागितले होते. त्या वेळी आक्षेप नोंदवूनही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एआरए) प्रकल्पासाठीच्या उर्वरित जागेवर संक्रमण शिबिरांच्या इमारती बांधण्याला परवानगी दिल्याचे महापालिकेने न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर न्यायालयाने या संक्रमण इमारतींच्या बांधकामाला स्थगिती दिली होती, परंतु मागील सुनावणीवेळी महापालिकेने आपली आधीची भूमिका बदलून एसटीपी विस्तारासाठी राखीव असलेल्या जमिनीचा मोठ्या प्रमाणातील भाग वगळण्याच्या निर्णयाचा फेरविचार करायचा असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर या बदलेल्या भूमिकेमागील कारणे स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करा, असे आदेश न्यायालयाने दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com