मुंबईत दुधात भेसळ; पाचजणंना अटक

मुंबईत दुधात भेसळ; 
पाचजणंना अटक
Published on

मुंबईत दुधात भेसळ;
पाच जणांना अटक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : वर्सोवा पोलिस ठाणे हद्दीत दूध भेसळप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाने चार ठिकाणी संयुक्त छापा मारून ६२१ लिटर दुधाचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

गुन्हे प्रकटीकरण शाखा युनिट क्रमांक ९ आणि अन्न व औषध प्रशासन (एफडीए) बृहन्मुंबई यांच्या पथकाने एफडीएचे सहआयुक्त (अन्न) चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच ही कारवाई केली. या मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकारी ऋतुजा जाधव, रामू माळी, श्रीपाद धरंगुट्टी, प्रतीक्षा मसुगडे तसेच सहाय्यक आयुक्त (अन्न) डॉ. भूषण मोरे यांनी सहभाग घेतला हाेता.
कारवाईदरम्यान अटक केलेल्या पाच जणांवर वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पथकाने तपासादरम्यान आठ अन्ननमुने विश्लेषणासाठी जप्त केले आहेत. जप्त केलेल्या ६२१ लिटर संशयित दूधाची किंमत सुमारे ३६ हजार २१९ रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. हे भेसळयुक्त दूध तत्काळ नष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com