

स्वयंचलित दरवाजांची साधी लोकल दाखल!
तांत्रिक चाचण्यांची परीक्षा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : जीवघेण्या अपघातांना आळा घालण्यासाठी रेल्वेने अखेर निर्णायक आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलत स्वयंचलित दरवाजांची साधी लोकल तयार केली आहे. देशातील ही पहिली (नॉन-एसी) लोकल सोमवारी कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली.
लोकलचे दरवाजे बंद ठेवून प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियंत्रित करण्याच्या दिशेने हा बदल महत्त्वाचा मानला जात असून, आता या लोकलच्या तांत्रिक चाचण्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या लोकलमध्ये स्वयंचलित स्लायडिंग दरवाजांची व्यवस्था असून, गाडी सुटण्यापूर्वी दरवाजे आपोआप बंद होतील आणि स्थानकावर थांबल्यानंतरच उघडतील. दरवाजे पूर्णपणे बंद झाल्याशिवाय गाडी सुरू होणार नाही, अशी इंटरलॉकिंग प्रणाली बसविण्यात आली आहे. त्यामुळे धावत्या गाडीतून चढ-उतरणे तसेच दरवाजात उभे राहणे यावर मोठा आळा बसण्याची अपेक्षा आहे.
...
तांत्रिक चाचण्यांची तयारी
या लोकलच्या आता विविध तांत्रिक चाचण्या करण्यात येणार आहेत. विशेषतः गर्दीच्या वेळी चढ-उतारासाठी लागणारा कालावधी, दरवाजांच्या कार्यक्षमतेचा वेग, तसेच वेळापत्रकावर होणारा परिणाम यांचा अभ्यास केला जाणार आहे. दरवाजांमुळे स्थानकांवरील थांबण्याचा वेळ वाढण्याची शक्यता असल्याने या बाबीकडे रेल्वेचे विशेष लक्ष राहणार आहे. पावसाळ्यात या स्वयंचलित दरवाजांच्या साध्या लोकलची खरी कसोटी ठरणार लागणार आहे. पाणी डब्यांमध्ये शिरण्याच्या समस्येचा विचार करून नव्या रचनेत ‘अँटी-वॉटर इन्ग्रेस’ प्रणाली देण्यात आली आहे.
...
डब्यांची रचना
डब्यांचा प्रकार - संख्या
प्रथम श्रेणी- ४ डबे
महिला प्रथम श्रेणी- २ डबे
दिव्यांगांसाठी- २ डबे
महिला द्वितीय श्रेणी- ५ डबे
सामानाचा डबा- १+१ (२ डबे)
द्वितीय श्रेणी- ८ डबे ( कंपार्टमेंट )
...
वैशिष्ट्ये अशी
- स्वयंचलित स्लायडिंग दरवाजे
- इंटरलॉकिंग सुरक्षा प्रणाली
- दरवाजात अडथळा आल्यास ऑटो रि-ओपन
- इमर्जन्सी ओव्हरराइड सुविधा
- ऑडिओ-व्हिज्युअल अलर्ट प्रणाली
- मोटरमनकडून दरवाजा नियंत्रण
- छतावरील फोर्स्ड व्हेंटिलेशन
- व्हेंटिलेशन झडपा असलेल्या खिडक्या
- मोठ्या आकाराच्या टफन्ड काच खिडक्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.