

डाॅ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन
प्रा. डॉ. सुधाकर बोकेफाडे सदस्य सचिव
मुंबई, ता. १३ : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला उच्च व तंत्रशिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन केले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत राज्यमंत्र्यांसह २१ जणांचा समावेश आहे. पुण्यातील प्रा. सुधाकर बोकेफाडे यांना सदस्य सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. माजी सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांना सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.
पहिल्यांदाच या समितीमध्ये कर्नाटकमधील डॉ. भीमराव भोसले यांना सदस्य म्हणून घेण्यात आले आहे. डॉ. रमेश पांडव, डॉ. सुनील भडंगे, प्रा. सुधाकर साळवे, सागर शिंदे, एकनाथ जावीर, डॉ. रमेश रावळकर, योगिता होके-पाटील, क्षितिज गायकवाड, डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. प्रा. विजय मोरे यांचाही समितीत समावेश आहे. मागील समितीत असलेल्या अनेक आंबेडकरी विचारवंत, प्राध्यापक, संशोधकांना स्थान देण्यात आले नसल्याचे दिसून येते. अनेक महिन्यांपासून या चरित्र साधने समितीचे काम मुदतवाढ न मिळाल्याने थांबले होते; मात्र आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ही समिती पुनर्गठित केल्याने समितीच्या कामाला वेग येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
--
दोन्ही समित्यांत एकच व्यक्ती
विभागाने १७ मार्चला जाहीर झालेल्या महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन केले होते. त्यात सदस्य म्हणून स्थान मिळालेल्या पुण्यातील एका उद्योगपतीच्या पत्नीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतही पुन्हा स्थान दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याऐवजी मुंबई, पुण्यातील संशोधक प्राध्यापकांना का घेण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.