

मुंबईत आज अग्निशमनदिन
मुंबई, ता. १३ : मुंबई गोदीत १४ एप्रिल १९४४ रोजी झालेल्या भीषण स्फोटात वीरमरण आलेल्या ६६ अग्निशमन जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मंगळवारी (ता. १४) भायखळा येथील मुख्यालयात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने उद्यापासून २० एप्रिलपर्यंत मुंबईत अग्निशमन सेवा सप्ताह साजरा केला जाणार असून, विविध जनजागृती उपक्रमांचा शुभारंभ होणार आहे. १९४४ मध्ये एस. एस. फोर्ट स्टिकीन या बोटीतील अग्निप्रलयात प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.