मुंबईत उकाड्याचा तडाखा वाढणार

मुंबईत उकाड्याचा तडाखा वाढणार
Published on

मुंबईत उकाड्याचा तडाखा वाढणार
पुढील तीन दिवस दमट, उष्ण हवामान

​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबईसह कोकण किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना येत्या काही दिवसांत भीषण उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवस अत्यंत उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिला आहे.
​कुलाबा हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल ते १६ एप्रिल या कालावधीत मुंबई आणि परिसरातील काही भागांत हवामान कोरडे असले, तरी आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहणार आहे. यामुळे तापमानाचा पारा वाढण्यासोबतच अंगाची लाहीलाही करणारा उकाडा जाणवणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ आणि १६ एप्रिलला मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चारही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची दाट शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही १५ एप्रिलला अशाच प्रकारचे हवामान राहील. १७ एप्रिलपासून मात्र हवामानात किंचित बदल होऊन स्थिती कोरडी राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत एप्रिल महिन्यात उष्णतेसोबतच हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा शरीराला जाणवणारा उकाडा अधिक तीव्र असतो. विशेषतः दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना घामाच्या धारा आणि उष्णतेच्या लाटेचा त्रास होऊ शकतो, असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
...
पाच दिवस हवामान कोरडे
उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत मात्र पुढील पाच दिवस हवामान पूर्णपणे कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईकरांनी वाढत्या उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आणि दुपारच्या वेळी शक्यतो सावलीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com