जागतिक पर्यटनात महाराष्ट्र अग्रेसर हवा

जागतिक पर्यटनात महाराष्ट्र अग्रेसर हवा
Published on

जागतिक पर्यटनात महाराष्ट्र अग्रेसर हवा
प्रभावी ब्रँडिंगसाठी सरकारचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १५ : महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला जागतिक नकाशावर अग्रस्थानी नेण्यासाठी राज्य सरकार आता आक्रमक पावले उचलत आहे. ‘‘जागतिक पर्यटनात महाराष्ट्र अग्रेसर हवा, यासाठी सर्वंकष आणि प्रभावी ब्रँडिंग व मार्केटिंग धोरण राबविण्याचा आमचा निर्धार आहे,’’ असे प्रतिपादन राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
​मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे पर्यटन विभागाच्या ‘मीडिया व ब्रँडिंग प्लॅन’संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, संचालक डॉ. बी. एन. पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ​महाराष्ट्रात ऐतिहासिक गड-किल्ले, विस्तीर्ण समुद्रकिनारे, समृद्ध जैवविविधता आणि धार्मिक तीर्थक्षेत्रांचा अद्वितीय संगम आहे. या वैभवशाली वारशाचे आधुनिक डिजिटल माध्यमांतून प्रभावी सादरीकरण केल्यास देश-विदेशातील पर्यटकांचा ओघ वाढेल, असा विश्वास मंत्री देसाई यांनी व्यक्त केला. केवळ नैसर्गिक सौंदर्यच नव्हे, तर महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती आणि लोकसंस्कृती यांचेही मार्केटिंग करण्यावर त्यांनी भर दिला. पर्यटनाच्या ब्रँडिंगसाठी टीव्ही, सोशल मीडिया, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा समन्वय साधणारी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा मार्केटिंग प्लॅन हा आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याची नवी ओळख निर्माण करणारा ठरेल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
...
स्थानिकांना रोजगार
सरकारच्या नवीन धोरणानुसार आता केवळ पारंपरिक पर्यटनच नव्हे, तर ग्रामीण पर्यटन आणि अनुभवाधारित उपक्रमांना चालना देण्यात येणार आहे. महाराष्ट्राला एक ‘मजबूत ब्रँड’ म्हणून स्थापित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असेही देसाई यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com