मतदारसंघ पुनर्रचनेला मनसेचा विरोध

मतदारसंघ पुनर्रचनेला मनसेचा विरोध
Published on

मतदारसंघ पुनर्रचनेला मनसेचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ ः लोकसंख्येच्या निकषावर लोकसभेच्या जागा वाढवण्याच्या हालचाली केंद्र स्तरावर सुरू असतानाच, आता याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र विरोध दर्शवला आहे. ‘ज्या राज्यांनी देशाच्या हितासाठी लोकसंख्या नियंत्रणाचे नियम पाळले, त्यांनाच राजकीय प्रक्रियेतून बाहेर फेकून हिंदी भाषिक राज्यांचे वर्चस्व लादण्याचा हा प्रयत्न आहे,’ अशा शब्दांत मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की ‘दिल्लीतून प्रस्तावित करण्यात आलेल्या या बदलांमुळे उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांच्या खासदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यामुळे देशाच्या राजकारणाची आणि सत्तेची चावी केवळ हिंदी भाषिक पट्ट्याकडेच राहील. बिगर-हिंदी भाषिक राज्यांनी, विशेषतः महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याने देशाच्या विकासात आणि महसुलात मोठे योगदान दिले आहे; मात्र केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या राज्यांचे संसदेतील महत्त्व कमी करणे, हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली. ‘महाराष्ट्राने कुटुंब नियोजनात आघाडी घेतली, शिक्षण आणि आरोग्यावर भर देऊन लोकसंख्या मर्यादित ठेवली. त्याचे फळ म्हणून आमचे खासदार कमी केले जाणार असतील, तर ही एकप्रकारे प्रगत राज्यांना दिलेली शिक्षाच आहे,’ असे अनिल शिदोरे म्हणाले.
...
सरकारला इशारा
मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय अस्तित्वावर घाला घालणारा कोणताही निर्णय मनसे सहन करणार नाही, असा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com