मुंबईत २७ एप्रिलपर्यंत पाच टक्के पाणीकपात

मुंबईत २७ एप्रिलपर्यंत 
पाच टक्के पाणीकपात
Published on

मुंबईत २७ एप्रिलपर्यंत
पाच टक्के पाणीकपात

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १६ : जलबोगद्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यासाठी सोमवारपासून (ता. २०) २७ एप्रिलपर्यंत मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांतील अनेक विभागांत पाच टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे या कालावधीत दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.

​महापालिकेतर्फे अमर महल (हेगडेवार उद्यान) ते वडाळा आणि पुढे परळपर्यंतचा ‘जलबोगदा-१’, तसेच अमर महल ते ट्रॉम्बेदरम्यानचा ‘जलबोगदा-२’ सुरू आहे. या जलबोगद्यांद्वारे पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांचे भरण (चार्जिंग), धुलाई (फ्लशिंग), क्लोरिनीकरण आणि डी-क्लोरिनीकरणाचे काम केले जाणार आहे. यासाठी प्रशासनाने ही कपात जाहीर केली आहे.
या कपातीचा एल (कुर्ला पूर्व), एम पूर्व, एम पश्चिम,(चेंबूर) एन (घाटकोपर), एस (भांडुप) आणि टी विभाग (मुलुंड) या ​पूर्व उपनगरांत, तर मुंबई शहरातील ए (कुलाबा), बी (डोंगरी) सी (काळबादेवी), ई (भायखळा), एफ उत्तर (माटुंगा) आणि एफ दक्षिण विभाग (प्रभादेवी) या भागात परिणाम जाणवणार आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com