प्राणवायू कक्षात महिला अडकली

प्राणवायू कक्षात महिला अडकली
Published on

प्राणवायू कक्षात महिला अडकली
तासाभरानंतर सुरक्षित सुटका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : कूपर रुग्णालयात उपचारासाठी आलेली ५८ वर्षीय महिला उच्चदाब प्राणवायू कक्षामध्ये अडकून पडली. तांत्रिक बिघाडामुळे कक्षाचे दार उघडता न आल्याने ती तासभर अडकली होती. अखेर तिला सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
महिलेच्या नातेवाइकांनी सांगितले की, त्यांचे नाव फातिमा खान असून, त्या तोंडाच्या कर्करोगाने त्रस्त आहेत. मागील काही आठवड्यांपासून जखम भरून येण्यासाठी त्या उच्चदाब प्राणवायू उपचार घेत होत्या. घटनेनंतर तत्काळ वैद्यांनी त्यांच्या सर्व वैद्यकीय स्थितीची तपासणी केली असून, सर्व स्थिती सामान्य असल्याचे आढळले. बाहेर आल्यानंतर महिलेने स्वतःला ठणठणीत असल्याचे सांगितले. या घटनेमुळे यंत्रसामग्रीची नियमित देखभाल केली जाते का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, यंत्रात अचानक बिघाड का झाला याची चौकशी आवश्यक असून, संबंधित कंपनीच्या तांत्रिक तज्ज्ञांना संदेश पाठवून तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. देव शेट्टी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com