मालाडचा भोंदू माँटीबाबाला अटक

मालाडचा भोंदू माँटीबाबाला अटक
Published on

मालाडचा भोंदू माँटीबाबाला अटक
आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीवरून कारवाई

मुंबई, ता. १६ ः व्यायामशाळेतील प्रशिक्षकाची नोकरी सोडून भोंदूगिरी करणाऱ्या मालाडच्या रिदम पांचाळ ऊर्फ माँटी बाबा या तरुणास दिंडोशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गोपनीय तपास करून ही कारवाई केली.
चार वर्षांपूर्वी रिदम परिसरातील एका अद्ययावत व्यायामशाळेत प्रशिक्षक म्हणून नोकरी करत असे. एकेदिवशी अचानक त्याने आपल्याला दैवी शक्ती प्राप्त झाली असून विविध देव अंगी संचारतात, असे भासवण्यास सुरुवात केली. आपण दैवी शक्तीद्वारे वैयक्तिक, व्यावसायिक अडथळे दूर करू शकतो, असे तो लोकांना सांगत होता. ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. पुढे दर गुरुवारी आणि शनिवारी माँटीबाबाचा दरबार मालाड पूर्वेकडील एका मोकळ्या जागी भरू लागला. येणाऱ्या भक्तांकडे माँटीबाबा दारू, सिगारेट, फरसाण, जिवंत कोंबडी, बोकडाचे काळीज, काळे तीळ आदी साहित्य मागवत होता. दारू, सिगारेट स्वतःसाठी ठेवून इतर साहित्यांसोबत तो अघोरी पूजा करीत होता. हे साहित्य विशिष्ट ठिकाणी फेकण्यास तो सांगत असे. सुरुवातीला दरबारात बरीच गर्दी होऊ लागली; मात्र माँटीबाबाच्या पूजेने समस्या दूर होत नसल्याचे पाहून लोक जाब विचारू लागले. तेव्हा आपल्या आड आल्यास जीवाचे बरेवाईट होईल, असा शाप माँटीबाबा देत असे. तसेच तो गुंडांमार्फत लोकांना धमकावत असे. त्यामुळे कोणीही तक्रार देण्याची हिंमत करत नव्हता. अखेर अनोश मोनोरे या तरुणाने तक्रार दिली, असे पोलिसांनी सांगितले. माँटीबाबाकडून फसवणूक झालेल्या व्यक्तींना तक्रार देण्याचे आवाहन दिंडोशी पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com