

दोन दिवसांत चोरीच्या ६० घटना
रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबईच्या उपनगरी रेल्वे परिसरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. अवघ्या दोन दिवसांत तब्बल ६० चोरीच्या घटना नोंद झाल्याने रेल्वे सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोहमार्ग पोलिसांच्या अधिकृत आकडेवारीनुसार १५ आणि १६ एप्रिलला मोबाईल चोरी, पाकीटमारी तसेच बॅग लंपास करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.
१५ एप्रिलला एकूण २७ गुन्ह्यांची नोंद झाली होती. यामध्ये मोबाईल चोरीच्या २० घटना, पाकीटमारीच्या दोन, तसेच बॅग व पर्स चोरीच्या चार घटनांचा समावेश होता. याशिवाय साखळी हिसकावण्याची एक घटना घडली होती; मात्र या सर्व घटनांपैकी केवळ एका गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. १६ एप्रिलला चोरीच्या घटनांमध्ये आणखी वाढ झाल्याचे दिसून आले. या दिवशी एकूण ३३ गुन्हे दाखल झाले असून मोबाईल चोरीच्या तब्बल २९ घटना समोर आल्या. तसेच बॅग, हँडबॅग आणि पर्स चोरीच्या तीन घटना नोंद झाल्या आहेत. या दिवशी चार गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे. सलग दोन दिवस वाढलेला हा आकडा चिंताजनक मानला जात आहे. दररोज लाखो प्रवासी मुंबईच्या उपनगरी रेल्वेने प्रवास करीत असताना अशा प्रकारे वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे लक्ष विचलित करून चोरटे हात साफ करीत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहे.
...
गर्दीत चोरट्यांचा सुळसुळाट
गर्दीच्या वेळी चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. रेल्वे पोलिसांकडून गस्त वाढविणे, सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात चोरीच्या घटनांवर अपेक्षित नियंत्रण मिळत नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळे रेल्वे सुरक्षा यंत्रणेकडून अधिक ठोस आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी आता प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.
...
चोरीच्या प्रकारानुसार घटना
मोबाईल चोरी : ४९
पाकीटमारी : २
बॅग / पर्स / हँडबॅग चोरी : ७
साखळी हिसकावणे : १
इतर गुन्हे : १
उलगडलेले गुन्हे : ५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.