

मध्य रेल्वेवर मध्यरात्री
१० तासांचा विशेष ब्लॉक
ठाणे-डोंबिवली कामांचा फटका, शेवटची लोकल चुकवू नका!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील फलाट विस्ताराच्या कामासाठी शनिवार मध्यरात्रीपासून १० तासांचा विशेष ट्रॅफिक व पॉवरब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी (ता. १९) सकाळी १० वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री १०.२८ सीएसएमटी स्थानकातून खाेपाेलीला जाणारी, तर कल्याणवरून सीएसएमटी लाेकल रात्री ११.१५ची शेवटची धीमी लाेकल सुटणार आहे.
ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ व ४ आणि डोंबिवली स्थानकातील फलाट क्रमांक १ए, १ व २ यांचा विस्तार करण्यात येणार आहे. मुलुंड ते ठाणे आणि दिवा ते डोंबिवलीदरम्यान दाेन्ही दिशांच्या धीम्या मार्गावर हा ब्लॉक असेल. यादरम्यान ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर काही गाड्या थांबणार नाहीत.
कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या लोकल गाड्या शनिवारी रात्री ११.२६ ते ११.५२दरम्यान आणि रविवारी पहाटे ३.२३ ते सकाळी ९.५५ दरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील. परळ, विद्याविहार आणि सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल गाड्यांनाही (रात्री १०.४९ ते पहाटे १२.१२ आणि सकाळी ४.४५ ते ९.०५) जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान सर्व लोकल गाड्या सरासरी १५ मिनिटे उशिराने धावतील. तसेच मेल व एक्स्प्रेस गाड्या पाचव्या आणि सहाव्या मार्गावरून चालविण्यात येणार आहेत.
-----
ब्लाॅकनंतर पहिली लाेकल
ब्लॉकनंतरची सीएसएमटीहून कल्याणसाठी पहिली लोकल सकाळी ९.२६ वाजता रवाना हाेईल. अप मार्गावर टिटवाळा-परळ ही कल्याणहून पहिली लाेकल सकाळी १०.०९ वाजता धावेल.
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.