चौकशीच्या साह्यासाठी टीसीएसतर्फे तज्ज्ञांची नियुक्ती

चौकशीच्या साह्यासाठी टीसीएसतर्फे तज्ज्ञांची नियुक्ती
Published on

चौकशीच्या साह्यासाठी टीसीएसतर्फे तज्ज्ञांची नियुक्ती

मुंबई, ता. १७ : टीसीएसच्या नाशिक युनिटमधील कथित धार्मिक छळ, धर्मांतर आणि लैंगिक सतवणूक यासंदर्भातील आरोपांच्या चौकशीसाठी तज्ज्ञांची नियुक्ती केल्याचे टीसीएसचे एमडी व सीईओ के. कृतिवासन यांनी जाहीर केले.
टीसीएसने यासाठी डेलॉईटमधील तज्ज्ञ तसेच एका कायदे फर्मचीही नियुक्ती केली आहे. तसेच देखरेखीसाठी टीसीएसचे स्वतंत्र संचालक केकी मिस्त्री यांचीही नियुक्ती केली आहे. निदा खान ही केवळ प्रोसेस असोसिएट म्हणून काम करत होती. ती एच. आर. मॅनेजर किंवा कर्मचारी भरतीसाठी जबाबदार व्यक्ती नव्हती किंवा तिच्याकडे कोणत्याही नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या नव्हत्या. नाशिकची शाखा अजूनही व्यवस्थित सुरू आहे. प्राथमिक चौकशीत नाशिक युनिटमध्ये कुठल्याही तक्रारी यंत्रणेत किंवा रेकॉर्डमध्ये आढळल्या नाहीत, असेही निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com