

वाकोला नाल्यावर जलवाहिनीसाठी पूल
महापालिकेचा तीन कोटींचा आराखडा तयार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक बळकट आणि सुरक्षित करण्यासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वांद्रे येथील वाकोला नाल्यावर विविध व्यासांच्या जलवाहिन्या नेण्यासाठी विद्यमान पुलाला समांतर असा एक स्वतंत्र पूल बांधण्याचा निर्णय पालिकेच्या पूल विभागाने घेतला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे तीन काेटी सात लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निविदा प्रक्रिया राबवून मे. व्ही. जे. कॉर्पोरेशन या कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे.
पश्चिम उपनगरातील ‘एच’ आणि ‘के’ विभागांत जलवाहिन्यांचे वळण करणे तांत्रिकदृष्ट्या गरजेचे झाले होते. जुन्या पुलांवर वाढणारा भार आणि भविष्यातील पाणीपुरवठ्याची गरज लक्षात घेऊन जल अभियंता विभागाने स्वतंत्र पुलाची मागणी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र नगर आणि वाल्मिकी नगर परिसरातील वाकोला नाल्यावर हा नवा पूल उभारला जाणार आहे. या प्रस्तावास अतिरिक्त आयुक्तांनी (प्रकल्प) आधीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या आराखड्यासाठी मे. टेक्नोजेम कन्सल्टंट्स प्रा. लि. यांची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
-----
असा आहे आराखडा
- पुलाची लांबी : ५८.५९५ मीटर
- पुलाची रुंदी : २.५० मीटर
- मजबुतीसाठी ७०० एमएम व्यासाच्या पाइल्स वापरणार
- पायाभूत संरचनेसाठी आरसीसी पाइल कॅप बसवणार
- सुपरस्ट्रक्चरसाठी ‘एमएस ई३५०’ गर्डरचा वापर केला जाणार
- पुलावर डेक स्लॅब उभारण्यात येणार
--------
आठ महिन्यांची मुदत
प्रकल्प पावसाळा वगळून आठ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. निविदेची विधिग्राह्यता २८ एप्रिल २०२६पर्यंत असून, हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी स्थापत्य समिती आणि स्थायी समितीकडे पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळताच कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.