‘एमएमआरडीए’च्या विकासकामांची भुरळ

‘एमएमआरडीए’च्या विकासकामांची भुरळ
Published on

‘एमएमआरडीए’च्या विकासकामांची भुरळ

आंध्र प्रदेशच्या प्राधिकरणांकडून ‘ब्ल्यू प्रिंट’चा अभ्यास

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मुंबईसह महानगर क्षेत्रातील विकासाच्या मॉडेलची आणि विकास प्रकल्पांची शेजारीला राज्यांना भुरळ पडली आहे. आंध्र प्रदेशातील विकासासाठी नव्याने स्थापन झालेल्या १२ नागरी विकास प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांनी विकासाच्या ब्ल्यू प्रिंटचा अभ्यास करण्यासाठी शुक्रवारी एमएमआरडीए मुख्यालयाला भेट देऊन शहरी विकासाची कार्यपद्धती समजून घेतली.

मुंबई महानगर प्रदेशातील नियोजन, संस्थात्मक रचना आणि पायाभूत सुविधा उभारणीच्या पद्धतींबाबत एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी आंध्र प्रदेश शासनाच्या महापालिका प्रशासन व नागरी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. नागरी विकास प्रकल्प, त्याची वित्तीय व्यवस्था, जमीन व्यवस्थापन आणि मोठ्या प्रमाणातील पायाभूत प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करता यावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

मजबूत जमीन अभिलेख व्यवस्था, विकास नियंत्रण नियमांची (डीसीआर) सखोल समज, सक्षम शहरी वित्तीय क्षमता, ॲसेट मॅपिंग आणि डेटाआधारित निर्णयप्रक्रिया यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच डिस्काउंटेड कॅश फ्लो पद्धतीवर आधारित प्रकल्प नियोजन, जमीन मूल्यवर्धन धोरणे, महसूल-वाटप प्रणाली आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेल्स यांच्या भूमिकेबाबतही डाॅ. मुखर्जी यांनी सविस्तर माहिती दिली.
------
चर्चेतील ठळक मुद्दे
- मुंबई महानगर प्रदेशातील (सुमारे ६,००० चौ.कि.मी.) एकात्मिक प्रादेशिक नियोजन आणि वाहतूक-आधारित विकासाचा आराखडा मांडला.
- विस्तारत असलेले मेट्रोचे जाळे, २०० कि.मी.पेक्षा अधिक लांबीच्या नियोजित आणि सुरू असलेले बोगदा प्रकल्प
- जमीन वापर आणि वाहतूक नियोजन यामधील समन्वय, पहिल्या व शेवटच्या टप्प्यातील कनेक्टिव्हिटी, आर्थिकदृष्ट्या सक्षम मॉडेल्सचा शहरी जीवनमानावरील परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com