मुंबईकरांवर पाच टक्के पाणीकपातीचे संकट

मुंबईकरांवर पाच टक्के पाणीकपातीचे संकट
Published on

मुंबईकरांवर पाच टक्के पाणीकपातीचे संकट
जलबोगद्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १९ : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलबोगद्यांच्या स्वच्छता आणि देखभालीचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. परिणामी, उद्यापासून म्हणजेच सोमवार (ता. २०) ते सोमवार (ता. २७) या कालावधीत मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील अनेक भागांत पाच टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे.
​अमर महल (हेगडेवार उद्यान) ते वडाळा आणि पुढे परळपर्यंतचा जलबोगदा क्र. १ तसेच अमर महल ते ट्रॉम्बे यादरम्यानचा जलबोगदा क्र. २ हे सध्या कार्यरत आहेत. या जलबोगद्यांची तांत्रिक कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे भरण (चार्जिंग), धुलाई आणि क्लोरीनीकरणाचे काम केले जाणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी सात दिवसांचा कालावधी लागणार असल्याने कपातीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
​या पाणीकपातीचा मोठा फटका मुंबईतील शहर आणि पूर्व उपनगरांतील अनेक प्रमुख विभागांना बसणार आहे. यामध्ये मुंबई शहर विभागातील ए, बी, सी, ई, एफ-उत्तर आणि एफ-दक्षिण या प्रभागांचा समावेश असून, पूर्व उपनगरातील एल (कुर्ला पूर्व), एम-पूर्व, एम-पश्चिम, एन, एस आणि टी या विभागांमधील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या सर्व भागांत पुढील सात दिवस पाणीकपात लागू राहील.
पुढील सात दिवस पाच टक्के कपातीसह कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

बाधित होणारे प्रमुख विभाग
​- मुंबई शहर : ए, बी, सी, ई, एफ-उत्तर आणि एफ-दक्षिण विभाग.
- ​पूर्व उपनगरे : एल (कुर्ला पूर्व), एम-पूर्व, एम-पश्चिम, एन, एस आणि टी विभाग.

धरणांमधील पाणीसाठा ३२ टक्क्यांवर
​महापालिकेच्या जल अभियंता विभागाने १९ एप्रिलला दिलेल्या अहवालानुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांमध्ये सध्या ३२.०६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा २८.७७ टक्के होता, तर २०२४ मध्ये तो २२.९९ टक्के इतका खाली घसरला होता.

​धरणनिहाय पाणीसाठ्याची स्थिती (दशलक्ष लिटरमध्ये) :
- ​अप्पर वैतरणा : ७०,०३६
- ​मोडक सागर : ४५,४३६
- ​तानसा : ३८,७००
- ​मध्य वैतरणा : ६६,६६७
- ​भातसा : २,२४,८८१
- ​विहार : १५,०५९
- ​तुळशी : ३,१७९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com