

शहापूर (वार्ताहर) : आसनगाव आणि वासिंद गावातील आठ आरएमसी प्रकल्पांना महसूल विभागाच्या भरारी पथकाने टाळे ठोकले आहे. या प्रकल्पांची तपासणी केली असता, कागदपत्रांचा अभाव आढळून आल्याने ही कारवाई केली आहे. तसेच काही प्रकल्प विनापरवाना सुरू असल्याचे निदर्शनास आले. याबाबत शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी सांगितले की, टाळे ठोकलेल्या प्रकल्पाना कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी घेतल्यानंतरच हे प्रकल्प पुन्हा सुरू होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.