मुंबईसह कोकणात दोन दिवस पावसाचे!

मुंबईसह कोकणात 
दोन दिवस पावसाचे!
Published on

मुंबईसह कोकणात दोन दिवस पावसाचे

मुंबई, ता. १९ ः मागील आठवडाभरापासून उन्हाच्या तडाख्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पाच दिवस पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे. त्यातच पुढील दोन दिवस मुंबईत पावसाची अधिक शक्यता असल्याचेही ‘आयएमडी’ने म्हटले आहे.
​हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवारी (ता. २०) मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. २१ एप्रिलला हवामान काहीसे कोरडे राहील; मात्र २२ एप्रिलला पुन्हा एकदा पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तवली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पुढील ४८ तास पावसाळी वातावरण राहणार आहे.

​कोकणात वादळी पाऊस?
​मुंबईच्या तुलनेत दक्षिण कोकणात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.​ रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहील. मध्यम स्वरूपाच्या पावसासह विजा कोसळण्याची शक्यता असल्याने आंबा आणि काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com