

‘सिद्धिविनायक’च्या
सुवर्णालंकारांचा लिलाव
९६ लाखांहून अधिक निधी जमा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : भाविकांनी मंदिरात अर्पण केलेल्या सुवर्णालंकारांचा रविवारी (ता. १९) जाहीर लिलाव करण्यात आला. या लिलावातून आणि चांदीच्या नाण्यांच्या विक्रीतून मंदिराच्या तिजोरीत एकूण ९६ लाख १७ हजार ५११ रुपयांची भर पडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लिलावासाठी एकूण १७१ सोन्याचे अलंकार ठेवण्यात आले होते. या अलंकारांचे एकूण वजन ६८४ ग्रॅम ८२० मिलीग्रॅम होती. तसेच त्यांची मूळ किंमत ९८ लाख ८७ हजार ७७९ रुपये निश्चित करण्यात आली होती. लिलाव प्रक्रियेदरम्यान भाविकांनी आणि इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. यामध्ये एकूण १७१ पैकी १५६ अलंकारांची यशस्वीरीत्या विक्री झाली. लिलावातून जमा झालेली सर्व रक्कम मंदिराच्या विकासकामांसाठी आणि समाजोपयोगी उपक्रमांसाठी वापरली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडलेल्या या लिलाव प्रक्रियेला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
----------------
लिलावाचा तपशील
विक्री झालेले अलंकार : १५६ (वजन ५७७ ग्रॅम ६८० मिलीग्रॅम)
प्राप्त रक्कम : ९० लाख ४७ हजार २११ रुपये
चांदीच्या नाण्यांची विक्री : ५ लाख ७० हजार ३०० रुपये
------
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.