

बेकायदेशीर बाइक टॅक्सी सेवांविरोधात एल्गार
सरकारच्या आदेशांकडे दुर्लक्ष; आझाद मैदानावर उपोषण सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता : ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाइक टॅक्सी कंपन्या परिवहनमंत्र्यांनी स्पष्ट आदेश डावलून बेकायदेशीरपणे मनमानी दर आकारत राज्यभर व्यवसाय चालवत आहेत. त्यामुळे चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, आजपासून (ता. २०) आझाद मैदानावर मोठ्या संख्येने चालक उपोषणाला बसले आहेत. लवकर निर्णय न झाल्यास बंदचा इशारा संघटनेने दिला आहे.
परिवहनमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत तसेच इतर प्रसंगी या कंपन्यांना बेकायदेशीर बाइक टॅक्सी सेवा तत्काळ बंद करण्याचे आणि शासनमान्य दर ॲपवर दाखवण्याचे आदेश दिले आहेत. शासनाने लेखी निर्देशही दिले, पण कंपन्यांनी याकडे जाग किंवा पर्वा न करता युजर ॲग्रीमेंटमध्ये दर ठरविण्याचा अधिकार नसल्याचे नमूद करत विसंगत दर लावले. अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले तरीही सुधारणा नाही. यामुळे चालकांना आर्थिक नुकसान होत आहे.
चालकांनी सांगितले की, हे केवळ आमचा अपमान नाही, तर शासन यंत्रणेचा अवमान आहे. या कंपन्या नियमांचे उल्लंघन करून राज्याच्या महसुलाचे नुकसान करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करून चालकांना न्याय मिळाला पाहिजे.
कंपन्याची मुजोरी सुरूच
ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या कंपन्याच्या मनमानी कारभाराविरोधात आम्ही आवाज उठवला आहे. वारंवार सरकारने आदेश देऊनही या कंपन्याची मुजोरी सुरूच आहे. आम्ही उपोषण करून हक्क मागत आहोत. मात्र, यावर लवकर निर्णय न झाल्यास कॅबचालकांना बंद करावा लागेल, असे महाराष्ट्र कामगार सभा अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.