पनवेलमध्ये लिफ्टमध्ये चार रेल्वे प्रवासी अडकले

पनवेलमध्ये लिफ्टमध्ये 
चार रेल्वे प्रवासी अडकले
Published on

पनवेलमध्ये लिफ्टमध्ये
चार रेल्वे प्रवासी अडकले

पाऊण तासानंतर सुखरूप सुटका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : पनवेल रेल्वे स्थानकावर सोमवारी (ता. २०) सकाळी गर्दीच्या वेळी फलाट क्रमांक ७ वरील लिफ्टमध्ये बिघाड झाला. या घटनेत चार प्रवासी अडकल्याने स्थानक परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण हाेते. सुमारे ४५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रवास ऐरणीवर आला आहे.

पनवेल रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ७ वरील लिफ्टमध्ये साेमवारी सकाळी ७.२० वाजता तांत्रिक बाघाड हाेऊन ती बंद पडली. या लिफ्टमध्ये तीन पुरुष आणि एक महिला प्रवासी अडकली हाेती. ऐन गर्दीच्या वेळेत ही घटना घडल्याने काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली हाेती. याबाबत माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, पोलिस आणि तांत्रिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी तत्काळ प्रयत्न सुरू केले. सुमारे ४५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर सकाळी ८.०५ वाजता लिफ्ट उघडण्यात यश आले आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
-------
चौकशी हाेणार
कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण आहे. लिफ्टच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी करण्याचे आदेश रेल्वेने दिले आहेत. त्यानुसार संबंधित यंत्रणेची तपासणी केली जाणार आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com